Showing posts with label Muse. Show all posts
Showing posts with label Muse. Show all posts

Monday, December 12, 2011

Creative Genius : What Is It?

Creative Genius - What Is It? असं असतं काय, स्फ़ूर्तीत? खरोखरच मनाला पडणारा हा एक मोठा प्रश्नच आहे. Creative Genius म्हणजे "सर्जनशील निर्मितिक्षमता". स्फूर्ती आली की काहीतरी नवीन लिहावं, रंगवावं; गाणं म्हणावं, गाण्याला चाल द्यावी, नवीन योजना आखावी, नवीन कल्पना लढवून नवी वस्तु करावी असं वाटू लागते. मुख्य म्हणजे, हातात घेतलेलं कामचं आपल्याला योग्य दिशेला खेचू लागतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण शारीरिक श्रमांचे किंवा मानसिक श्रमांचे भानचं विसरून जातो. मग, असं, असतं काय स्फूर्तीत? स्फूर्तीत एक स्फुरण चढतं, कल्पना तरळतात, कुणी तिला अंत:स्फूर्ती म्हणतं, कुणी तिला प्रतिभा म्हणतं, कुणी ईश्वरी प्रेरणा म्हणतं, स्फूर्तीचा पेला तोंडाला लावला की कृतिमध्ये कलागुण चातुर्य, बुद्धितेज झळकू लागतं. ती व्यक्ति बेफिकीर होते. चुकलं तर चुकलं या थाटात वेगात त्या व्यक्तिकडून चूक होतंच नाही. सगळं अर्पून हरपून ही मंडळी गुंग झालेली दिसतात, मग असं, असतं काय स्फूर्तीत? What's in a muse?