Monday, December 12, 2011

Creative Genius : What Is It?

Creative Genius - What Is It? असं असतं काय, स्फ़ूर्तीत? खरोखरच मनाला पडणारा हा एक मोठा प्रश्नच आहे. Creative Genius म्हणजे "सर्जनशील निर्मितिक्षमता". स्फूर्ती आली की काहीतरी नवीन लिहावं, रंगवावं; गाणं म्हणावं, गाण्याला चाल द्यावी, नवीन योजना आखावी, नवीन कल्पना लढवून नवी वस्तु करावी असं वाटू लागते. मुख्य म्हणजे, हातात घेतलेलं कामचं आपल्याला योग्य दिशेला खेचू लागतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण शारीरिक श्रमांचे किंवा मानसिक श्रमांचे भानचं विसरून जातो. मग, असं, असतं काय स्फूर्तीत? स्फूर्तीत एक स्फुरण चढतं, कल्पना तरळतात, कुणी तिला अंत:स्फूर्ती म्हणतं, कुणी तिला प्रतिभा म्हणतं, कुणी ईश्वरी प्रेरणा म्हणतं, स्फूर्तीचा पेला तोंडाला लावला की कृतिमध्ये कलागुण चातुर्य, बुद्धितेज झळकू लागतं. ती व्यक्ति बेफिकीर होते. चुकलं तर चुकलं या थाटात वेगात त्या व्यक्तिकडून चूक होतंच नाही. सगळं अर्पून हरपून ही मंडळी गुंग झालेली दिसतात, मग असं, असतं काय स्फूर्तीत? What's in a muse?

Creative Genius
Muse म्हणजे ग्रीक देव 'झ्युस' याच्या नऊ कन्यांपैकी एक देवता. या सर्व देवता म्हणजे विद्द्या, कला, काव्य म्युज़ म्हणजे स्फूर्ती. स्फूर्तीस्थानाकडून आपण स्फूर्ती घेतो. कलाकार Sanjay Bhattachaarya म्हणतो की, स्फूर्ती म्हणजे नेहमीच स्त्री असते असे नाही, माझी स्फूर्ती म्हणजे शुद्ध कलेवरचं प्रेम आहे.

Indrani Rajkhowa Banerji म्हणतात Raja Ravi Verma पासून ते M. F. Hussain पर्यंत प्रत्येकजण स्फुरण येण्याकरिता स्फूर्तीदेवतेची आळवणी करतो. Everbody seeks a muse for inspiration! शरीर मनातून स्फूर्तीचे स्त्राव जेंव्हा वाहू लागतात एक अस्वस्थता येते. भान विसरतं तेव्हांच, माणसाकडून प्रचंड कार्य केलं जातं. Film-maker 'Satyajit Ray' यांचे स्फूर्तिस्थान म्हणजे Sharmila Tagore, Guru Dutt यांचे स्फूर्तिस्थान म्हणजे Waheeda Rehman तर Shyam Benegal यांचे स्फूर्तिस्थान Smita Patil होत्या. Dev Anand त्यांच्या आत्मचरित्रात ते Zeenat Aman बद्दल मत व्यक्त करतात. सिनेमासृष्टित, स्फूर्तीची हजारो उदाहरणे देता येतील.

Pralhad Keshav Atre, Ram Ganesh Gadkari ना स्फूर्तिस्थान म्हणत. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे १८७८ पासूनचे न्यायमूर्ती Mahadev Govind Ranade अध्यक्ष पाहिले तर स्फूर्तीचा पेला पुढे पुढे जात आहे असंच दिसतं. संगीतात Lata Mangeshkar, Aasha Bhosale कितीतरी गायिकांची स्फूर्तिस्थाने आहेत.

Master Muse Relationship किंवा कलाकार आणि स्फूर्तिस्थान यामधलं नातं अवर्णनीयच असतं. ते स्फूर्तिस्थान म्हणजे तुम्हीच होउन जाता. तुमची निर्मिती म्हणजे जणू काही हुबेहूब त्या तेज:पुंज स्फूर्तीदेवतेची नक्कल असते. लहानपणी मला V. S. Khandekar यांची पुस्तके खूप आवडंत. उदाहरण द्यायचेच झाले तर "ययाति (Yayaati)". मला कधी कधी असे वाटे की, मी असं साधं, हलकंफ़ुलकं लिहू शकेन कां? त्यांना माझा सलाम...!!!

No comments: